सोळाव्या शतकात मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती. त्या काळात शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी अहमदनगरचा राजा मुर्तूजा खान याने बीडचा तत्कालीन सरदार सलाबत खान याला खजाना देऊन इथं एक विहीर बांधायला सांगितली. त्या काळचा प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्कर याने इ.स. १५७२ मधे ही विहीर बांधली. मुर्तूजाशाहकडून आलेला सगळा खजिना या विहीरीसाठीच खर्च झाला, म्हणून या विहीरीला ‘खजिना विहीर’ म्हणतात.
जमीन पातळीपासून विहीरीची एकूण खोली ७ मीटर एवढी आहे. विहीरीचा आतील व्यास १९ मी. इतका आहे. विहिरीच्या बांधकामासाठी चूना आणि दगडाचा वापर केलेला आहे. जमिनीपासून १७ फुटांवर विहिरीत गोलाकार ओरांडा आहे, त्यावर आपण सहज फिरू शकतो. तिथे बसण्यासाठी तीन दगडी बाकडेही बांधलेले आहेत. या विहिरीचं पाणी कायम चार फूट इतकंच असतं.
या विहिरीला तीन बोगदे आहेत. यातील एक नैऋत्य, दुसरा आग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला आहे. नैऋत्य आणि आग्नेय दिशेला असलेले बोगदे हे ह्या विहीरीचे इनलेट आहेत. या दोन बोगद्यांद्वारे विहिरीत पाणी येतं. तर उत्तर दिशेचा बोगदा हा आउटलेट आहे. यातून हे पाणी बाहेर जातं. या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागापर्यंत अजूनही पाणी येतं. या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे या भागातील शेकडो एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता सिंचनाखाली आहे.
विहिरीतून जाणाऱ्या भूमिगत बांधीव कालव्याला हवा पुरवठ्यासाठी या कालव्यावर अंतराअंतरावर दगडी चिरेबंदी स्वरुपात ‘झडपा’ बांधलेल्या आहेत. ह्या एखाद्या छोट्या आडासारख्या दिसतात. त्यांची खोली १५ फूट ते १६.५ फूट इतकी तर त्यांचा व्यास २ फूट इतका आहे. यात उतरायचीही व्यवस्था केलेली आहे. पूर्वी लोकं यातून पोहत पलीकडे निघायची. आजही या पाण्याचा प्रवाह कायम आहे. यातून येणारं पाणी अतिशय स्वच्छ आहे. अडीच कि.मी. लांबीच्या भूमिगत कालव्यावर अशा एकूण ५३ झडपा आहेत. हे सगळं पाणी भूमिगत म्हणजे जमिनीच्या खालून जवळपास ३ किमी पर्यंत कालव्याने शेताला पोचवण्याचं तंत्रज्ञान आश्चर्यचकीत करणारं आहे !
King Murtuza Khan of Ahmednagar gave the treasure to the then Sardar of Beed, Salabat Khan, and asked him to build a well here. The famous architect of that time, Raja Bhaskar, This well was built in 1572.

source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here